Ganam
Red Light Diaries Gauhar By Sameer Gaikwad
Red Light Diaries Gauhar By Sameer Gaikwad
Couldn't load pickup availability
ज्या दुनियेपासून समाज चार हात अंतर राखून असतो, ज्या स्त्रियांचं अस्तित्व समाज बेदखल करतो, झिडकारतो, तिरस्कार करतो; त्या दुनियेचं, तिथल्या हाडा-मांसाच्या स्त्रियांचं, त्यांच्या स्वप्नांचं, आकांक्षांचं प्रतिबिंब रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक !
या पुस्तकातल्या बहुतांश कथा वेदनेच्या, शोषणाच्या आणि दुःखाच्या आहेत. त्या वाचताना मन सोलवटून निघतं. डोळ्यांतून नकळतपणे पाणी झरू लागतं. हतबलता घेरून राहते… पण तरी काही कथा मात्र सकारात्मक प्रकाशाचा कवडसा हाती देतात. निराशेच्या अंधारात छोटासा दिवा लावतात.
गौहर म्हणजे मोती. यातली बायका-माणसंही मोत्यासारखी… स्वतःचं तेज असलेली. निसर्गाच्या कुशीतून जन्मून उजळपणाची खूण वागवणारी !
हे उजळलेपण तुमच्यापर्यंत पोचवण्याची सच्च्ची धडपड म्हणजेच
रेड लाईट डायरीज : गौहर
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.