sadhana prakashan
RANADE,GANDHI AANI JINNAH रानडे , गांधी आणि जीना By Avadhut Dongare अवधूत डोंगरे
RANADE,GANDHI AANI JINNAH रानडे , गांधी आणि जीना By Avadhut Dongare अवधूत डोंगरे
Couldn't load pickup availability
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 जानेवारी 1943 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पुण्यात इंग्रजीतून एक भाषण दिलं. ते त्याच वर्षी एप्रिल महिन्यात 'रानडे, गांधी अँड जीना' या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं. त्या संपूर्ण पुस्तकाचं हे नवीन मराठी भाषांतर आहे. या भाषणाच्या शीर्षकात तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं असली तरी, प्रत्यक्षात हे भाषण त्या व्यक्तींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या आस्थेचे प्रश्न आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन साररूपात मांडणारं आहे. म्हणजेच आंबेडकरांच्या विचारविश्वाचा गाभा या भाषणात सापडतो. इतिहासाची जडणघडण आणि त्यामधील मानवी कर्तेपणाचं स्थान, राजकीय आणि सामाजिक लोकशाहीचा विचार, सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी, श्रेणीबद्ध विषमतेच्या रूपातील जातिव्यवस्था, माध्यमांचा व्यवहार, धर्माचं मानवी जीवनातलं स्थान, या विषयांसोबतच उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद इत्यादी विचारसरण्यांबद्दलची आंबेडकरांची मतंही या भाषणातून वाचायला मिळतात. या भाषणाच्या अनुषंगाने आंबेडकरांच्या विचारव्यवहारातील धागेदोरे जोडून काहीएक आकृती स्पष्ट करण्याचा प्रयत्न सविस्तर विवरणात्मक टिपांमधून केला आहे. आंबेडकरांच्या भाषणात येणाऱ्या विपुल संदर्भाचे स्रोत नोंदवणं, तसंच त्यांनी या भाषणात नोंदवलेल्या मुद्द्याची त्यांच्या इतर विचारव्यवहाराशी कशी सांगड बसते याची उकल करणं, आणि त्यातील वाद-संवादाच्या शक्यतांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं, अशा उद्देशाने या टिपा लिहिल्या आहेत.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.