Ganam
Punyachi Samruddha Budhwar Peth By Suprasad Puranik
Punyachi Samruddha Budhwar Peth By Suprasad Puranik
Couldn't load pickup availability
समृद्ध बुधवार पेठेचा इतिहास उलगडणार...
पुणे शहरातील अत्यंत महत्वाची पेठ म्हणजे बुधवार पेठ. बुधवार पेठ एक व्यापारी पेठ होती आणि आहे. कारण अनेक प्रकारच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आजही येथेच यावे लागते. पुण्यातील बऱ्याच महत्वाच्या वास्तू, मंदिरे, संस्था, रस्ते, चौक, दुकाने, नाट्य-चित्रपटगृह या बुधवार पेठेत होते आणि आजही आहेत. तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती, भारतातील पहिली मुलींची शाळा असे बरेच काही या पेठेत आहे. इथे जागोजागी इतिहास आहे. परंतु बुधवार पेठ म्हटलं की फक्त वेश्यावस्ती आठवते. ही पेठ त्यामुळे थट्टेचा विषय राहिली आहे आणि या पेठेची बदनामी झालेली आहे. बुधवार पेठेवर लागलेला हा चुकीचा शिक्का पुसण्यासाठी हे पुस्तक आहे. या पेठेच्या नाण्याची दुसरी बाजू पुस्तकरूपी समोर घेऊन येत आहोत.
Book available After 17 August
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.