Ganam
Prematun Premakade By Dr. Aruna Dhere
Prematun Premakade By Dr. Aruna Dhere
Couldn't load pickup availability
एक अतिशय गुंतागुंतीचं, पण गवसलं तर आयुष्याला उजळून टाकणारं असं मैत्रीचं नातं आहे. एकाच वेळी कोमलही असतं ते आणि कमालीचं कणखरही असतं. मैत्रीचा स्पर्श स्त्री-पुरुषांना कसा होतो, त्या स्पर्शानं त्यांची आयुष्यं कशी बदलतात, घडतात, मोडतात, कसे ते विस्तारतात, समजूतदार आणि शहाणे होतात, याचा शोध आपल्याही जीवनजाणिवा विकसित करणारा असतो.
समाजाच्या अस्तित्वाचं भान स्त्री-पुरुषमैत्रीला कायमच ठेवावं लागलं आहे. समाजनिरपेक्ष अवकाशात मुक्त बहरू शकणारं ते नातं नाही. मग समाजाला सामोरे जाणारे स्त्री-पुरुष वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, कधी नात्यांमधून तर कधी अनाम नातं जपून आपल्या मैत्रीचा नितळपणा कसे सांभाळतात, कुटुंब आणि परिवाराच्या अस्तित्वाला ते मैत्रीच्या संदर्भात कसे स्वीकारतात आणि मैत्रीच्या अस्तित्वासाठी कशी आणि कोणती किंमत चुकवतात, याचा शोध कधी अस्वस्थ करणारा, कधी जिव्हारी लागणारा आणि कधी शांत, आश्वासित करणारा आहे.
मैत्रीची रूपमाया सार्वजनिक क्षेत्रात वावरणार्या थोरामोठ्यांच्या आयुष्यांतही दिसते. समाजात वावरणारी, समाजाचं नेतृत्व करणारी, नामवंत अशी माणसं. त्यांच्या थोरवीच्या तळाशी त्यांचं माणूसपणही आहेच आणि त्या माणूसपणाच्या मुठीत मैत्री नावाचं मूल्य. त्या प्रेममय मैत्रीविषयी लिहिलेले हे ललितबंध आहेत.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.