Skip to product information
1 of 1

Ganam

Prawas Janmojanmicha By Brian Weiss

Prawas Janmojanmicha By Brian Weiss

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

ही कथा आहे, एका विख्यात मानसोपचार तज्ज्ञाची आणि त्याच्या पेशंटची! कॅथरीन या रुग्णावर अठरा महिने उपचार करणार्‍या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ब्रायन वीज़ यांना म्हणावं तसं यश येत नव्हतं. कॅथरीनला सतत भयानक स्वप्नं पडत, अतिचिंतेचे अ‍ॅटॅक्स येत. जेव्हा पारंपरिक उपचारपद्धती तिच्याबाबतीत अयशस्वी ठरल्या, तेव्हा डॉ. वीज़ यांनी संमोहन उपचार पद्धती वापरायची ठरवली आणि त्या उपचारपद्धतीने कॅथरीनला तिचे पूर्वजन्म दिसू लागले. डॉ. वीज़ थक्क झाले, कॅथरीनच्या सद्य जन्मातल्या सर्व आजारांची, प्रश्‍नांची उत्तरं तिच्या पूर्वजन्मात दडली आहेत, हे समजल्यावर! त्यांना आश्‍चर्य वाटलंच, पण मनात साशंकताही होती.

 

आणि पुढचं सुखद आश्‍चर्य म्हणजे दोन जन्मांमधल्या अवकाशातून अनेक संदेश कॅथरीन त्यांच्यापर्यंत आणू लागली. या संदेशातून त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे त्यांना झाले, तशी त्यांच्या मनातली साशंकता मावळली. अतिशय ज्ञानी अशा आत्म्यांकडून (मास्टर्स) जीवन आणि मृत्यूविषयीच्या अनेक गूढ गोष्टींची माहिती डॉ. वीज़ यांना देण्याचं माध्यम ती बनली.

 

अविस्मरणीय अशा या ‘केस’ ने कॅथरीन आणि डॉ. वीज़ यांचं सारं आयुष्यच बदलून टाकलं. मनाच्या गूढ रुपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मृत्यूनंतरही अविरत सुरु असणारं जीवन आणि सद्य जीवनातील आपल्या वर्तणूकीवर असणारा पूर्व जन्मातील अनुभवांचा प्रभाव या गोष्टींबद्दलही सांगितलं.

View full details