Ganam
Power Of Confidence By Manoj Ambike
Power Of Confidence By Manoj Ambike
विश्वास, आत्मविश्वास, स्वविश्वासाच्या जोरावर कोणतेही काम यशस्वी होऊ शकते, याची प्रचिती अनेकदा आपल्याला येत असते. पण आत्मविश्वासाबाबत अनेक जण डळमळीत असतात. आपल्याला हे करता येईल का, जमेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचा बागुलबुवा मनामध्ये कायम असतो. मनोज अंबिके यांनी 'पॉवर ऑफ कॉन्फिडन्स'मधून आत्मविश्वास जागृत करण्याची उर्जा दिली आहे. आपण वेगळे आहोत हे लक्षात घेऊनच आपल्यातील वेगळेपण शोधण्यातहे पुस्तक मदत करते. आत्मविश्वास म्हणजे काय, तो केव्हा असतो, केव्हा नसतो,आत्मविश्वासाचे शत्रू, त्यावर विजय कसा मिळवायचा, देहबोली, स्वतःवर विश्वास, स्वसंवाद, दुसऱ्याशी सुसंवाद, जीवनाचे ध्येय, सकारात्मक मन, मनाचे सामर्थ्य, बेधडक वृत्ती, यशाची गुरुकिल्ली आदी छोट्या छोट्या प्रकरणांतून आत्मविश्वास जागविण्याचे भान यातून मिळते.
स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी प्रत्येकजण ‘असामान्य’ आहे. मी ‘असामान्य आहे’ हे समजण्यासाठी... * बेधडक व्हा * अपयशातील यश * विश्वासाची शक्ती * बलस्थानं ओळखा * वेगळेपण ओळखा * आत्मविश्वासाचे शत्रू * स्वतःवर विश्वास ठेवा * दृष्टीतला आत्मविश्वास * संवादातून आत्मविश्वास * पडा पण ध्येयाच्या दिशेने * ‘नाही’ म्हणायचा अधिकार
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.