manovikas prakashan
Pageer | पागीर By Bharat Daundkar | भरत दौंडकर
Pageer | पागीर By Bharat Daundkar | भरत दौंडकर
Couldn't load pickup availability
पागीर म्हणजे हाताने फेकता येणारं गोलाकार जाळं. एकदा का हे जाळं
अंगावर पडलं की ते माशांची जिवंत सळसळ थांबवतं. अंगावर पडलेल्या
पागीरातून माशांना निसटता येत नाही. पागीर खांद्यावर घेऊन नदीकाठ
धुंडाळणारे कोळी, भोई दिसतात. त्यांच्या जीवन संघर्षाची धडपड भरत
दौंडकर यांनी रेखाटली आहे. हे एका कवीचं गद्यलेखन असल्याच्या खुणा
पाना-पानावर दिसून येतात. माशांचे अगणित प्रकार, जाती, लक्षणं, वैशिष्ट्य
या लेखनात आहेत. वाम, कटला, रोहू, मरळ अशी नावं आपल्याला परिचित
असतात पण खदरा, खडशी, बोबर, मुळांड, तांभरा, इचका, आहेर, सुरक्या,
शेंगळ, कुर्डु अशी माशांची असंख्य स्थानिक नावं... भीमा, भामा, इंद्रायणी,
मुळा, मुठा, गोदावरी, पंचगंगा, कृष्णा अशा अनेक नद्यांच्या पोटात सामावणारं
हे चमचमणारं चांदणं. जणू पाण्याच्या पोटातली चांदी...
काळ बदलला. चिलापीसारख्या माशांचं प्रस्थ वाढत गेलं. तर कुठे प्रदूषणाचं
जहर पाण्यात मिसळल्यानेही अनेक जाती नामशेष व्हायला लागल्या. माणूस
आणि मासा दोघांचंही सारखंच आहे. ज्यांची धडपड, सळसळणं अविरत आणि
निरंतर तेच जीवनाच्या संघर्षात टिकतात. भरत दौंडकर यांच्या पागीर मधून
नदीच्या पोटातल्या खळबळ, तगमग आणि तडफडीचा तसेच नदीकाठच्या
लोकजीवनाचा दुर्लक्षित पदर खूपच बारकाव्यानिशी आला आहे. तरतरीत
अशा नव्या संदर्भांचा ऐवज या लेखनात आहे. वाचकांना हे लेखन नक्कीच
वेगळा आनंद देऊन जाईल.
- आसाराम लोमटे
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.