Ganam
Paach Shahare By Ahmet Hamdi Tanpinar
Paach Shahare By Ahmet Hamdi Tanpinar
विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.
कवी, कादंबरीकार आणि समीक्षक असलेले अहमेत हमदी तानपिनार हे इस्तंबूल विद्यापीठात ओट्टोमन आणि तुर्की साहित्याचे प्राध्यापक होते. त्यांची ‘पाच शहरे’ ही कादंबरी प्रथम तुर्की भाषेत १९४६ मध्ये ‘Beş Şehir’ नावाने प्रकाशित झाली होती. या कादंबरीची सुधारीत आवृत्ती १९६० मध्ये प्रकाशित झाली.
अनातोलियन इतिहासातील महत्त्वाच्या पाच शहरांवर आणि तानपिनार यांच्या भावनिक जीवनावर केंद्रित असलेले पाच काव्यात्मक निबंध असं या कादंबरीचं स्वरूप आहे. इतिहास आणि आत्मचरित्र यांची सरमिसळ करत लिहिलेल्या या कादंबरीत काळ आणि स्मृती यांवर लेखकाने काव्यात्मक चिंतन केले आहे.
स्वप्नरंजनात्मक शैलीत लिहिलेल्या या कादंबरीत आयुष्यातील उदास स्मृती आणि देशाच्या अप्रत्याशित भविष्याची चिंता यांतील ताण वाचायला मिळतो.
नोबेल पारितोषिक विजेते ओरहान पामुक यांच्या ‘इस्तंबूल : एक शहराच्या आठवणी’ या पुस्तकाशी तुलना करता, ‘पाच शहरे’मध्ये वैयक्तिक दृष्टिकोन आणि प्रतिक्रियांवर जोर दिला आहे; त्याचबरोबर भूगोल, इतिहास आणि संस्कृतीची विस्तृत व्याप्ती या लेखनात दिसून येते.
शर्मिला फडके यांनी केलेल्या अनुवादामुळे ‘Bes Sehir’ ही कादंबरी प्रथमच मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.