Ganam
Oxygen By Ranjan Garge (ऑक्सिजन)
Oxygen By Ranjan Garge (ऑक्सिजन)
Couldn't load pickup availability
पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा.
हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं !
आणि जगात एकच हाहाकार माजला.
या समस्येवरचा तोडगा काय ?
तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली.
पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन.
तर वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.'
या झगड्यात भारताचं धोरण काय होतं ?
जागतिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या 'श्वास मंत्रालया'तर्फे
पॉडच्या माध्यमातून बंदिस्त परिसंस्थेची निर्मिती करण्याची योजन नेमकी काय होती ही योजना ?
'ग्रीन ड्रीम' संघटनेचा या योजनेला विरोध का होता ?
एव्हरेस्टची वाढणारी उंची अन् ऑक्सिजनच्या पातळीतील घट यांचा एकमेकांशी,पर्यावरणबदलाशी काय संबंध ?
आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात.
या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का ?
पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी!
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.