Ganam
Of Many Heroes By Ganesh Devi
Of Many Heroes By Ganesh Devi
मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीमागे गर्भित राजकारण दडलेले असते. याला साहित्येतिहास-लेखनपद्धतीसारखा गंभीर विषय तरी कसा अपवाद ठरू शकतो? साहित्येतिहास-लेखनपद्धती आणि इतिहासाचे भान हे आपणाला वसाहतवादाने बहाल केले आहे. इतिहासकार हा गतकालाकडे अतिशय त्रयस्थपणे, निर्लेपपणे पाहत असतो, अशा गृहीतकांना धक्का देण्याचे काम ‘ऑफ मेनी हिरोज’ हा ग्रंथ करतो.
साहित्येतिहास म्हणजे तटस्थपणे केलेले दस्तऐवजीकरण असे एक ढोबळमानाने मानले जाते, परंतु अशा स्वरूपाच्या लेखनामागेदेखील विशिष्ट विचारव्यूह, सत्ताकारण आणि सांस्कृतिक संघर्ष हे अटळपणे कसे कार्यरत राहत असतात याचे नेमके भान हा ग्रंथ आपणास देतो. साहित्येतिहासाबाबतच्या वैचारिक मंथनाबरोबरच भारतामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेल्या साहित्येतिहासलेखन परंपरेचा एक विशाल पट वेधक स्वरूपात आपणासमोर या ग्रंथातून उलगडत जातो. मानवी जीवन संपन्न आणि समृद्ध बनवणारे साहित्य, ललित कला, इतिहास, अभिव्यक्ती असे सारेच विषय ऐरणीवर आलेल्या आजच्या भयप्रद काळामध्ये ‘ऑफ मेनी हिरोज’चे वाचन आणि चिंतन एकूण समाजव्यवस्थेकडे चिकित्सक नजरेतून पाहण्याची एक नवी दृष्टी प्रदान करते.
गणेश देवी यांचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘आफ्टर अॅम्नेसीया’ या ग्रंथामधील विचार साहित्येतिहासाच्या अनुषंगाने तपासून पाहणार्या ‘ऑफ मेनी हिरोज’चे वाचन हे इतिहास, शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान अशा ज्ञानशाखांचे अभ्यासक आणि समाज, संस्कृती याप्रति सजग असणार्या प्रत्येकाला आवाहन करणारे आहे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.