Ganam
Nehru Te Bose By rudranshu Mukherjee avdhut Dongre
Nehru Te Bose By rudranshu Mukherjee avdhut Dongre
Couldn't load pickup availability
जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही’, असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं? आणि १९४५मध्ये सुभाषचंद्रांच्या अकाली निधनाची वार्ता ऐकल्यावर जवाहरलाल यांना अश्रू का अनावर झाले? शिवाय, `मी त्यांना लहान भाऊ मानायचो’, असे उदगार नेहरूंनी का काढले?
स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते.
आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी… नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास !
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.