Ganam
Navyane Ghadavu Swatala By jaykumar hariharan Shruti Panase
Navyane Ghadavu Swatala By jaykumar hariharan Shruti Panase
तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा झालेली बघायची आहे? अशी सुधारणा करणं हा तुमचा धर्म आहे, असं समजा.
हे आपल्याला जगासाठी नाही, तर स्वतःसाठी करायचं आहे.
जर स्वतःमध्ये सुधारणा केली, तर आपल्यामध्ये आलेलं जडत्व जाऊन एक प्रकारचा मोकळेपणा येतो. जडत्व कशामुळे आलं होतं, हे लक्षात घेतलं, तर आता निर्माण झालेली पोकळी सकारात्मकतेने भरायला हवी. त्यासाठी स्वतःला तयार करायला हवं.
लेखक जयकुमार हरिहरन यांनी स्वतःला आणि इतर अनेकांना आयुष्याबद्दल कळीचे प्रश्न विचारले. त्यातून त्यांना ‘यश’ आणि ‘जीवनातल्या अर्थपूर्णतेचा मार्ग गवसला. समृद्धीच्या जगात वावरताना मध्येच आपल्याला आपल्यातलं दारिद्र्य का जाणवायला लागतं? हे दारिद्र्य नेमकं कसलं? आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करण्यापेक्षा स्वतःशी संवाद साधायला हवा, आपल्या स्वप्नांची प्रतिबिंबं आपल्याला सापडायला हवीत, शिवाय हा संवाद विवेकी असायला हवा. लेखक जय यांनी भिन्न प्रकारच्या व्यक्तींची उदाहरणं दिली आहेत, त्यातून आपल्याला त्यांची जडणघडण समजते. लोकांचे तऱ्हेतऱ्हेचे किस्से आणि गोष्टी यांमुळे योग्य मार्गावर कसं चालायचं आणि अडचणी किनाऱ्यावरच कशा ठेवायच्या, हे आपल्याला समजेल. सध्याच्या आधुनिक युगातल्या कॉर्पोरेट योद्धांच्या जीवनात कशी उत्साहवर्धक उलथापालथ झाली, हे या पुस्तकात मांडलं आहे; पण यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वतःच्या आयुष्यातली अर्थपूर्णता कशी शोधायची, हीच आहे. जे आज शिखरावर आहेत आणि तरीही आतून कसलीतरी रुखरुख वाटायला सुरुवात झाली आहे, त्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे.
तुम्ही एकटे नाही आहात.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.