Skip to product information
1 of 1

Ganam

Nathang Aani Itar Katha By Manasi Holehonnur

Nathang Aani Itar Katha By Manasi Holehonnur

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
मानसी होळेहोन्नूर यांची कथा ख्याल गायकीसारखी धिम्या दमदारपणे अवतरते. माणसांच्या जगण्याचे पेच, त्यांची मानसिक आंदोलनं मांडणारी ही कथा विषय व आशय चहूबाजूंनी पाहत त्याला सर्वांगीण अभिव्यक्ती देते. छोट्याशा बंदिशीचा विस्तार होताना आपण अनुभवतो, तसा मानसींच्या कथांमध्ये प्रत्यक्ष ‘गोष्ट’ कमी आणि ती घडण्याला कारणीभूत झालेले, एकमेकांत गुंतलेले घटक जास्त, यामुळे तिची गुणात्मकता आणि पर्यायाने विस्तार झाल्याचा अनुभव आपण घेतो.

कथानुकारी निवेदनशैली स्वीकारत कथन आपोआप आकार घेत आहे, असं दिसतं. प्रत्येक घटना, संवाद, परिसराचं आवश्यक तेवढं वर्णन कथेचा परिपोष करणारं आहे, त्यामुळेही ही कथा सशक्त व प्रवाही होताना दिसते. बाईपणाचे वेगवेगळे पदर, स्त्रीमनाची गुंतागुंत नोंदवणारी, धीट, वास्तवाला जाऊन भिडणारी अशी ही कथा आहे. स्त्रियांचा सिक्स्थ सेन्स जसा विशेष असतो, तसा या कथांचा सेक्स सेन्स हा विशेष घटक आहे.

आपलं जगणं आपल्याला सरळसोट एकरेषीय भासतं, पण ते तसं नसतं. वरवर दिसायला आपण तुटक जगतो, तुटक वागतो, तुटक विचार करतो; पण ते सगळं एकत्रितपणे आपल्या आत जे मिसळलेलं असतं - त्यातून आलेलं असतं, आणि एखाद्या निर्णायक प्रसंगी ते आपल्याला उमगतं. त्यामागे कित्येकदा हा सेक्स सेन्स कार्यरत असतो. मानसीच्या सगळ्या कथांतील माणसांची, बंधनांत जखडलेली ‘मनं’ एका क्षणी एकदम मोकळी-ढाकळी होऊन आपल्याला सामोरी येतात. पुरुष असोत वा स्त्रिया, आपल्याला वाटणार्‍या समलिंगी-विरुद्धलिंगी आकर्षणाविषयी, लैंगिक जाणिवांविषयी, गरजांविषयी ती व्यक्त होतात.

तेव्हाही वाटतं, माणसांचं मन थांग न लागणारं - नथांग आहे. अशा नथांग मनातील उलथापालथीच्या या कथा आहेत.
View full details