Ganam
Nata Doghancha By Rajendra Barve
Nata Doghancha By Rajendra Barve
आयुष्यातील प्रत्येक स्थित्यंतराला सामोरं जाताना व्यक्ती गडबडते. गोंधळून जाते. प्रेमसंबंध, विवाह, आईवडीलपण निभावणं अशा नव्या बदलांशी जुळवून घेताना आपण कधी मार्गदर्शक पुस्तकं वाचतो, तर कधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतो. पतिपत्नीच्या नात्यात अपरिहार्यपणे येणार्या ताणतणावांच्या बाबतीत समुपदेशन करणारी व्यक्ती डॉ. राजेंद्र बर्वेंसारखी निष्णात मानसोपचारतज्ज्ञ असेल तर मग दुधात साखरच!
वास्तविक दोघांचं खाजगीपण जपणारं हे लग्न लागताक्षणी मात्र सामाजिक बनतं. ‘त्या’ दोघांच्या नात्यात आलेला गुंता कधी संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणतो, तर कधी कौटुंबिक जबाबदार्या किंवा समाजाचा दबाव दोघांच्या नात्यात बाधा आणतो. प्रस्तुत पुस्तकात उपाय करणं अशक्य वाटणार्या समस्यांची केलेली कौशल्यपूर्वक हाताळणी समस्त जोडप्यांना मार्गदर्शक ठरावी!
प्रत्येक पतीपत्नीने संग्रही ठेवावे असे पुस्तक.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.