Ganam
Nagarikanchya Adhikaranchi Aani Kartavyanchi Sanad By Prof. Dr. Bhalba Vibhute
Nagarikanchya Adhikaranchi Aani Kartavyanchi Sanad By Prof. Dr. Bhalba Vibhute
Couldn't load pickup availability
समजा, तुम्हाला तुमच्याच घरातली एक सुसज्ज अशी खोली दिली आणि
सांगितलं की, तू या खोलीतून कधीच बाहेर यायचं नाही आणि कोणाशी
काही बोलायचंही नाही, तर काय होईल?
विचार करा... याने तुमच्यावर अन्याय होईल. माणूस म्हणून तुमचं स्वातंत्र्य
नाकारलं जाईल. तुम्हाला ते चालेल? नाही चालणार, कारण मनासारखं राहता
येणं, वागता येणं हेच तर आपल्या जीवंतपणाचं लक्षण आहे. म्हणूनच आपली
राज्यघटना आपल्याला माणूस म्हणून स्वातंत्र्याचा हक्क बहाल करते. त्याचवेळी
इतरांच्या अशा स्वातंत्र्यात बाधा येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीही सोपवते.
या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला असे कोणते अधिकार, हक्क मिळतात?
जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये काय असतात? हे आपण समजून
घेतलं पाहिजे. तोच दृष्टिकोन ठेवत या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
यातून आपणा सर्वांनाच आपल्या अधिकारांची, कर्तव्यांची जाणीव होईल.
किंबहुना शालेय, महाविद्यालयीन मुलांबरोबरच शिक्षक, पालक संविधान
साक्षर व्हावेत अशी अपेक्षा आहे. ती पूर्ण व्हायची असेल, तर प्रत्येकाने हे
पुस्तक आपल्या जवळ बाळगलंच पाहिजे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.