Ganam
NADIMUKH by PERUMAL MURUGAN
NADIMUKH by PERUMAL MURUGAN
Couldn't load pickup availability
कुमारासुर, त्याची पत्नी मंगासुरी आणि त्यांचा मुलगा मेघास, असं एक त्रिकोणी कुटुंब. कुमारासुर सरकारी नोकरीत आहे. एकूणच, तंत्रज्ञानाविषयी कुमारासुर उदासीन आणि नकारात्मक आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणारा मेघास कुमारासुराकडे नवीन महागड्या मोबाइलची मागणी करतो. मेघासला मोबाइल गेम खेळण्यासाठी हवा असेल किंवा ब्ल्यू फिल्म पाहण्यासाठी हवा असेल किंवा सेल्फी काढण्यासाठी पाहिजे असेल, असा समज कुमारासुर करून घेतो. टेक्नॉलॉजीमुळे आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे मेघास बिघडणारच अशी ठाम समजूत करून घेतल्यामुळे कुमारासुर विचित्र मनोव्यापारांमध्ये भोवंडत असतो. मंगासुरीला त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे त्याची काळजी वाटायला लागते. ती कुमारासुराच्या मित्राला, अधिकासुराला त्याला यातून बाहेर काढण्याची विनंती करते. अधिकासुराच्या सहवासात कुमारासुराच्या मनावरचं मळभ नाहीसं होतं. आजूबाजूच्या वास्तवाचं रुपकात्मक चित्रण करणारी कादंबरी.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.