Ganam
MOTHI MANASE By NARENDRA CHAPALGAONKAR
MOTHI MANASE By NARENDRA CHAPALGAONKAR
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला. त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे. त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्ठेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी, तर दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे.
या सगळ्या व्यक्तींनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती. व्यक्तिगत जीवनातील इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. अशी असंख्य माणसे त्या काळात होऊन गेली. या पुस्तकातील व्यक्तिचित्रांमध्ये त्या सर्वांचे स्मरण अंतर्भूत आहे.
आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करत असताना या मोठ्या माणसांचे स्मरण नक्कीच प्रस्तुत ठरावे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.