Ganam
Mobile Vyasanmukti By Tushar Ranjankar, Navnath Jagtap
Mobile Vyasanmukti By Tushar Ranjankar, Navnath Jagtap
Couldn't load pickup availability
गेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.
तुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने "मोबाईल व्यसनमुक्ती" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील "स्वयंमूल्यांकन चाचणी" आणि "15 दिवसांचा कृती आराखडा" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल.
डॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स
आजकाल मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, त्याचा अतिवापर व्यसनात कधी बदलतो हे कळत नाही. हे उपकरण कार्य पूर्ण करण्यास जरूर वापरा पण अतिवापर टाळा . त्याच्या आधीन होऊ नका व त्याचा सकारात्मक माफक वापर करा . मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्ही फोनपासून दूर राहाल. नवीन छंद जोपासा किंवा बाहेर फिरायला जा. गरज वाटल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) करून तुम्ही मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर पडू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता. लक्षात ठेवा, मोबाईल आपला सेवक आहे, मालक नाही!
ह्या महत्वाच्या विषयावर हे पुस्तक नक्कीच आपल्याला प्रबोधन करेल .
डॉ दीपक शिकारपूर (डिजिटल साक्षरता प्रसारक ६३ पुस्तकांचे लेखक)
सध्या जवळजवळ प्रत्येक घरात दिसणाऱ्या समस्येवर श्री तुषार रंजनकर यांनी लिहिलेले पुस्तक ही काळाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मोबाईल फोनचे व्यसन जडले आहे. गंमत म्हणजे स्वतः ला असे व्यसन लागले आहे हे सहसा कुणी मान्य करत नाही पण घरातील इतरांना असे व्यसन आहे यावर सर्वांचे एकमत असते.
म्हणूनच या पुस्तकात व्यसन म्हणजे काय यावर स्वतंत्र प्रकरण आहे आणि व्यसनांचे विविध प्रकार आणि त्यावर उपाय सांगितले आहेत.
मोबाईल फोनचा आवश्यक वापर करायला हवा पण त्याच्या शिवाय चैन पडत नसेल तर आपण व्यसनाला बळी पडू लागलो आहोत हे मान्य करून त्यापासून दूर होण्यासाठी उपाय योजना देखील या पुस्तकात दिलेली आहे.
हे पुस्तक घरोघरी पोहोचून त्यातील उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी इच्छाशक्ती सर्वांमध्ये निर्माण होवो याच शुभेच्छा - डॉ यश वेलणकर
डॉ यश वेलणकर
जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.