Ganam
Mind And Self Management By Kanchan Dixit
Mind And Self Management By Kanchan Dixit
Couldn't load pickup availability
प्रस्तुत पुस्तकात आपल्या अचेतन मनाची शक्ती, सवयी आणि समजुतींचे शास्त्र या संकल्पनांवर आधारित व्यवहार्य विचार मांडले आहेत. मेंदू आणि मन हार्डवेअर व सॉफ्टवेअर म्हणून कसे कार्य करतात, याचे विवेचन करून मानसिक आणि भावनिक समृद्धी मिळवण्याचे मार्ग दाखवले आहेत.
– डॉ. मधुश्री सावजी
संस्थापक व विश्वस्त, ओंकार विद्यालय,
विद्याभारती अखिल भारतीय मंत्री
कार्ल युंग या विख्यात मानसशास्त्रज्ञाने ‘शॅडो’ अशी एक संकल्पना मांडली आहे. त्यानुसार आपल्या प्रत्येकाच्या मनात काही काळोखे कोपरे, खोल डोह आणि अंधाऱ्या गुहा असतात. ही ‘शॅडो’ आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असते आणि त्याचं प्रतिबिंब वेळोवेळी आपल्या वागण्यात, नातेसंबंधांत व आयुष्यात पडत असतं. आपलं बालपण, भोवताल, पूर्वानुभव असे काही घटक या ‘शॅडो’ला कारणीभूत ठरतात. आणि ही काळी बाजू जर तुम्हाला समजून घेता आली नाही आणि त्यावर काम करता आलं नाही, तर संपूर्ण आयुष्यभर ती व्यक्ती दुःखी, असमाधानी आणि दोषारोप करणारी म्हणूनच जगते. या नेमक्या वर्मावर बोट ठेवणारं काम कांचन यांनी केलं आहे.
– गौरी साळवेकर
कार्यकारी संपादक, साकेत प्रकाशन
कांचन दीक्षित या टाइम आणि सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं, याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या टाइम ॲण्ड सेल्फ मॅनेजमेंट या बेस्टसेलर पुस्तकाच्या ५००० पेक्षा जास्त प्रतींची एका वर्षातच विक्री झाली आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.