Ganam
Meluha Te Bharat By Dr. Nitin Hande
Meluha Te Bharat By Dr. Nitin Hande
Couldn't load pickup availability
विज्ञान हे जरी कल्पनाशक्तीतून जन्माला येत असले तरी या कल्पनाशक्तीला देखील क्षितिजाची मर्यादा असते. वळणाच्या पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू लागतो, त्याप्रमाणे उपलब्ध विज्ञानाच्या, माहितीच्या आधारेच पुढील शोध लागत असतात. विज्ञानाचा हा प्रवाह निरंतर वाहत आला आहे. अनेक शास्त्र, तत्त्वज्ञान आणि कलाशाखांचा जन्म तसेच विस्तार भारतात झाला आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान जरूर असावा, मात्र तो वृथा नसावा, अभ्यासामधून आलेला असावा. आपल्या संस्कृती, ज्ञान, साहित्य आणि कलेच्या गौरवशाली परंपरेचा तटस्थपणे अभ्यास करून तथ्यांची मांडणी करण्याचा ‘मेलुहा ते भारत’ हा प्रयत्न आहे. ‘भारतामध्ये सर्व काही आधीच निर्माण झाले होते’ आणि भारतात कधीच काहीच ज्ञान नव्हते’ अशी दोन विरुद्ध टोकाची मांडणी आपल्याला पाहायला, ऐकायला मिळते. मग यात नक्की सत्त्य काय असेल? इतिहास हा अस्मितेशी जोडला जातो आणि अस्मिता ही नेहमी गौरवशाली परंपरेचा शोध घेत असते. मात्र ऐतिहासिक तथ्यांना तुमचे भावनेशी देणेघेणे नसते, तथ्य नेहमी वस्तुनिष्ठ असतात. इतिहासातील दूधात मिसळलेल्या पाण्याला वेगळे करण्याचा वस्तुनिष्ठ प्रयत्न या पुस्तकात केला आहे. सोन्याचा धूर निघतो अशी आख्यायिका असलेल्या भारतदेशाने हजार वर्षांपूर्वी विज्ञान, तत्त्वज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा ‘मेलुहा ते भारत’ हा आढावा आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.