Skip to product information
1 of 1

Ganam

Maze Premache Prayog By Amit Markad

Maze Premache Prayog By Amit Markad

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

माणूस आयुष्यात चुका करतोच. आयुष्यात सगळं परफेक्ट अथवा मनासारखं कधी होतंच असं नाही. कधीकधी परिस्थिती अशी होते की, आपल्या हातात, वागणुकीत ती बदलण्याची ताकद देखील राहत नाही, पण कुठेतरी मनात आपल्या वागण्याची आपल्या काही चुकांची आणि आपल्यात असणाऱ्या वाईटाची, चांगुलपणाची आपण स्वतःलाच कबुली देत आपण त्याप्रमाणे घडत जातो. या अनुभवांमुळे दिवसेंदिवस सदविवेक, समजुतदारपणा आपल्या बोलण्या-वागण्यात यायला लागतो आणि आपण पुढची वाटचाल करतो.

 

मैत्री असो वा कुठलेही नाते ते जपण्यासाठी, प्रेमापेक्षा विश्वास किती जास्त मोलाचा असतो हे समजताना नात्याची गाठ घट्ट बांधली जाते. दिलेल्या शब्दाला आणि विश्वासाला किती किंमत असते, याची पारख आपण स्वतःच करू लागतो.

 

दुनियादारीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमित यांच्या पुस्तकात वाचायला मिळतील. त्या संदर्भात अनेक प्रसंग भेटतील. वाचताना तुमचे चांगले-वाईट अनुभव सतत तुमचा पाठलाग करत राहतील, जे तुमच्या आयुष्यातील घटनांवर अवलंबून असतील.

 

त्यांच्या आयुष्यातील प्रसंगावर लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्यांचा व्यक्त होण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

 

जे आहे ते असं आहे म्हणत, कोणतीही शंका मनात न ठेवता सगळ्यांसमोर आपले अनुभव त्यांनी या पुस्तकातून मांडले आहेत. सर्वांच्याच आयुष्यात असे गोड-कडू प्रसंग येत असतात. पण लेखकाने ज्या प्रमाणे हे सगळं मांडलं आहे ते सांगायला सगळ्यांना जमत नाही, हे मात्र नक्की.

 

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेली वेगवेगळी प्रेमप्रकरणं, त्यातून आलेले वेगवेगळे अनुभव, हरलेल्या, जिंकलेल्या आणि शिकलेल्या अनेक प्रेमांची एक गोष्ट म्हणजे माझे प्रेमाचे प्रयोग.

View full details