Ganam
Marathyancha Itihas : Granthasuchi By Kavita Bhalerao
Marathyancha Itihas : Granthasuchi By Kavita Bhalerao
ज्या विषयाचा पूर्ण शोध करण्याला शेकडो वही अपुरी पडावी, त्यांचा शोध शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या ग्रंथसूचीवरून क्षणार्धात लागू शकतो आणि अभ्यासकाच्या मार्गातील विघ्नांचे निराकरण होऊन त्याचा मार्ग सोपा होतो, असे सूचीचे महत्व थोर सूचीकार शं. ग. दाते यांनी वर्णन केले आहे. सुमारे अडीचशे वर्षांची व्याप्ती असलेल्या मराठा इतिहासाच्या अभ्यासकांना तर सूची हे वरदानच ठरावे, कारण या विषयात आजवर बरेच संशोधन झाले आहे. अनेक नवनवे संदर्भ उपलब्ध होत आहेत, अनेक इतिहास संशोधकांनी त्यावर भाष्ये केली आहेत. ग्रंथ लिहिले आहेत. पण हे संदर्भ, संदर्भग्रंथ अनेक ग्रंथालयांत विखुरलेले असल्याने सहजपणे उपलब्ध नाहीत. गो. स. सरदेसाईकृत ‘मराठी रियासती वे पुनर्संपादन करताना संदर्भाच्या या अनुपलब्धतेची जाणीव झाली तेव्हा सूचीची आवश्यकता वाटली. आणि ‘मराठ्यांचा इतिहास : ग्रंथसूची’ या कविता भालेराव यांनी तयार केलेल्या ग्रंथसूचीचे प्रकाशन करण्यात आले. अल्पावधीतच या ग्रंथाची पहिली आवृत्ती यशस्वी ठरली.
या ग्रंथसूचीच्या दुसऱ्या आवृत्तीतही मराठी व इंग्रजी असे दोन विभाग पाडले आहेत व प्रत्येक विभागात ग्रंथकार नामसूची आणि ग्रंथाविषय वर्गीकरण सूची असे उपविभाग आहेत. त्यामुळे ग्रंथ किंवा ग्रंथकार यांपैकी कोणत्याही एका नावावरून संदर्भ शोधणे शक्य होते. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि संशोधकांना सुलभ रीतीने ग्रंथांचा शोध घेता यावा यासाठी या सूचीची केलेली ही रचना मार्गदर्शक ठरते.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.