Skip to product information
1 of 1

Ganam

MARATHI STREE ATMAKATHANANCHI WATCHAL By Chaya Raje Pratibha Kanekar

MARATHI STREE ATMAKATHANANCHI WATCHAL By Chaya Raje Pratibha Kanekar

Regular price Rs. 1,000.00
Regular price Rs. 1,200.00 Sale price Rs. 1,000.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

स्त्री आत्मकथनांकडे केवळ एक साहित्यप्रकार किंवा बाईने लिहिलेली आपल्याच

 

आयुष्याची गोष्ट' इतक्या सहजपणे न पाहता अधिक गंभीरपणे पाहण्याची

 

आवश्यकता आहे ही जाणीव 'मराठी स्त्रीआत्मकथनांची वाटचाल (१९१०-

 

२०१०)' हे पुस्तक अधोरेखित करते.

 

जोवर स्त्री लिहू शकत नव्हती तोवर ती पुरुषांच्या लेखनाचा विषय होती. ती स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतः लिहू लागते तेव्हा स्वाभाविकच तिचा अनुभव, तिच्या भावना, तिचे आकलन, तिचा दृष्टिकोन, तिच्या जाणिवा केंद्रस्थानी येतात व तिची स्वप्रधानता व्यक्त होऊ लागते.

 

तरीही प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या स्त्रीआत्मकथनांतून व्यक्त होणारी स्त्री ही तिची दर्पणप्रतिमा आहे. समाजाच्या डोळ्यांत आपण जशा दिसायला हव्या आहोत तशाच आपण दिसायला हव्या आहोत, अशा सांस्कृतिक दडपणाखाली त्या स्वतःला व्यक्त करतात. हळूहळू समाजव्यवस्थेने लादलेल्या बंधनातून मुक्त होऊ पाहणारा त्यांचा सूर तीव्र होऊ लागतो तेव्हा त्यांच्या आत्मकथनांना कैफियतींचे स्वरूप येते आहे की काय असे वाटते. मात्र स्त्रीला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या कारणाने आत्मभान येऊ लागते. त्या वैयक्तिक सुखदुःखांना ओलांडून स्त्रीजात, स्त्रीजीवन, मानवी जीवन, देश, समाजाचे नवनिर्माण अशा विषयांवर चिंतन करू लागतात. कृती करू लागतात तेव्हा इतिहासात आजवर अलक्षित राहिलेल्या त्यांच्या कार्याचे कॅलिडोस्कोपिक चित्र त्यांच्या लेखनातून उमटते.

 

स्त्रियांच्या आत्मकथनांतील एक आदिबंध प्रवासा'चा आहे. निरक्षरतेकडून साक्षरतेकडे, नसतेपणाकडून असतेपणाकडे, स्वभानाकडून विश्वभानाकडे होणारा त्यांचा प्रवास आहे. दुसरा आदिबंध 'फिनिक्स पक्ष्याचा आहे. जन्मापासून नाकारली गेलेली 'ती' अनेक संकटांतून राख होता होता उंच झेप घेते. दलित स्त्रीआत्मकथने केवळ 'वीरनायकाच्या' आदिबंधात व्यक्त होत नाहीत तर दलित स्त्रीजीवन, दलित मानसिकता, दलित चळवळ, दलित नेतृत्व ह्यांवरही भाष्य करतात. २००० नंतर, सर्व स्त्रियांचे लिंगभावात्मक अनुभव एकमेकींपेक्षा फार वेगळे नाहीत हे जाणवल्यामुळे असेल, ते अनुभव पायाखाली घेऊन नवनवी कार्यक्षेत्रे आत्मसात करून त्याविषयी स्त्रिया लिहू लागल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा निखळ आनंद त्यांना

 

अनुभवायला मिळाल्याच्या नोंदी अजूनही अतिशय कमी आहेत.

View full details