Ganam
Marathekalin Savkari Pedhi - Vyavsay By Dr. Rekha Ranade
Marathekalin Savkari Pedhi - Vyavsay By Dr. Rekha Ranade
Couldn't load pickup availability
१७ व्या शतकात छत्रपति शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रूपांतर १८ व्या शतकात साम्राज्यात झाले. १८ व्या शतकात मराठी सत्ता प्रबळ होऊन मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार भारतभर झाला. या विस्तारवादी धोरणाचे अनेक परिणाम झाले. त्यातील एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे १८ व्या शतकात मराठ्यांना नवीन आर्थिक अवकाश उपलब्ध झाले आणि व्यापार-उदीम, उद्योगधंदे, सावकारी पेढी-व्यवसाय यांसारख्या आर्थिक घडामोडींना चालना मिळून अर्थकारणाला नवीन दिशा मिळाली. या ज्या नवीन संधी निर्माण झाल्या होत्या त्यांचे महत्त्व ओळखून त्यांचा उपयोग करून घेणाऱ्या व्यक्ति पुढे येणे आवश्यक होते. यात जशी आर्थिक जोखीम होती तशीच विकास होण्याचीही संधी होती. काहीजण हे आव्हान स्वीकारायला तयार झाले. यामुळे पेढी- व्यवसाय करणाऱ्या सावकारांचा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात तयार झाला. १८ व्या शतकातील सावकारी पेढी-व्यवसायाच्या राजकीय लष्करी क्षेत्रांबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे हा व्यवसाय सत्ता संरचनेतील एक आधारस्तंभ झाला. पुणे हे या व्यवसायाचे भारतातील महत्त्वाचे केंद्र बनले.
१८ व्या शतकातील या सावकारी पेढी व्यवसायाचा विस्तार होण्याची प्रक्रिया, त्याची कारभार करण्याची पद्धत, सावकार इत्यादी बाबी जाणून घेणे अभ्यासपूर्ण तसेच रंजक ठरेल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.