Ganam
Marathayancha Itihas Khand 1 Shivshahi Ani Khand 2 Peshwai Set By DR JAYSINGRAO PAWAR
Marathayancha Itihas Khand 1 Shivshahi Ani Khand 2 Peshwai Set By DR JAYSINGRAO PAWAR
Couldn't load pickup availability
मराठयांचा इतिहास खंड १ शिवशाही
शिवशाहीपूर्व कालखंडापासून ते राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरच्या कालखंडावर प्रकाश टाकणारा हा खंड आहे. शहाजीराजांना परकीय सत्तांमध्ये करावी लागलेली चाकरी, त्यांचं स्वराज्यस्थापनेचं अर्धवट राहिलेलं स्वप्न, शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सगळे प्रसंग, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची संभाजीराजांची कारकीर्द, संभाजीराजांच्या मृत्यूनंतर उद्भवलेली परिस्थिती, येसूबाई आणि शाहू महाराजांना झालेली वैÂद, त्यानंतर राजाराम महाराज, ताराबाई, संताजी-धनाजी आणि अन्य मराठा सरदारांनी, मावळ्यांनी मोगलांशी निकराचा संघर्ष करून स्वराज्याचं केलेलं रक्षण, मराठ्यांनी अटकेपार लावलेले झेंडे, मराठ्यांच्या या दैदीप्यमान यशापाशी येऊन हा खंड थांबतो. जवळजवळ पूर्ण सतराव्या शतकातील इतिहास डॉ. जयसिंगराव पवार यांनी ऐतिहासिक संदर्भ-साधनांसह उलगडला आहे. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अवघा महाराष्ट्र जाणतो; परंतु शहाजीराजे, संभाजीराजे, रामराजे, ताराबाई यांचं कर्तृत्व सगळ्यांनाच ज्ञात नसतं. ते अधोरेखित करण्याचं काम हा खंड करतो. तर शतकभराच्या इतिहासाचा हा दस्तावेज अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी तर उपयुक्त आहेच; पण सर्वसामान्य वाचकांनाही आवडेल असा आहे.
मराठयांचा इतिहास खंड 2 पेशवाई
पेशवाईपूर्व कालखंडापासून ते मराठेशाहीच्या अस्तापर्यंतच्या कालखंडावर प्रकाश टाकणारा हा खंड आहे. बाळाजी विश्वनाथचा मराठेशाहीत प्रवेश, शाहूमहाराजांशी असलेले त्याचे संबंध, त्याला मिळालेली पेशवाईची वस्त्रे, त्याचं कर्तृत्व, बाळाजी विश्वनाथ ते दुसरा बाजीराव असा पेशवाईच्या उदयापासून ते अस्तापर्यंतचा प्रवास या खंडात अंतर्भूत केला आहे. त्या-त्या पेशव्याची कामगिरी, त्यांच्या कारकिर्दीतील राजकीय परिस्थिती, त्यांनी लढलेल्या लढाया, पेशवे-छत्रपती संबंध, पेशवाईतील अंतर्गत लाथाळ्या, पानिपतचे युद्ध, बारभाईचे कारस्थान, इंग्रजांशी वेळोवेळी झालेल्या लढाया, झालेले तह, महादजी शिंदे यांचे कर्तृत्व, त्यांनी इंग्रजांशी दिलेला निकराचा लढा, उत्तरेत स्वत:चा निर्माण केलेला दबदबा, होळकरांचा पराक्रम आणि प्रसंगी स्वामिनिष्ठेला फासलेला हरताळ, दिल्लीतील बादशहांभोवती फिरणारं राजकारण इ. जवळजवळ शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास या खंडातून सलगतेने, अभ्यासपूर्णतेने आणि ससंदर्भ उलगडला आहे. तर शंभर-सव्वाशे वर्षांच्या इतिहासाचा हा दस्तावेज अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी तर उपयुक्त आहेच; पण सर्वसामान्य वाचकांनाही आवडेल असा आहे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.