Ganam
Mantra By Vinayak Bandopadhya Sumati Joshi
Mantra By Vinayak Bandopadhya Sumati Joshi
Couldn't load pickup availability
पितृछत्र हरपलेल्या कोवळ्या वयातल्या उत्तरणला त्याची आई संन्यासी ब्रह्मचारी ठाकूर यांच्या पायाशी समर्पित करते. परंतु कठोर वास्तवाच्या आघातामुळे एके दिवशी उत्तरणला आश्रम सोडून निघून जावं लागतं. आश्रम सोडल्यानंतर जिच्या घरी त्याला आसरा मिळतो, त्या अनसूयेला उत्तरणच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचंय. संसार करावा की व्रतस्थ आयुष्य जगावं अशा संभ्रमावस्थेत असतानाच उत्तरण विचारांच्या एका वळणावर अनुसूयेसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतो.
हे नातं पुढील आयुष्यात कोणतं वळण घेतं? उत्तरणपुढे कोणते पेच निर्माण होतात? या व इतर पेच प्रसंगांची उकल कशी होत जाते? लेखक बिनायक बंद्योपाध्याय त्यांच्या संवादी शैलीत ही कथा या कादंबरीत समर्थपणे रंगवत जातात.
ईश्वरासोबत एकरूप होत आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या एका ‘संसारी संन्याशाची’ अध्यात्मिक धाटणीची कादंबरी… मंत्र !
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.