Ganam
Manasik Aghaat Samajun Ghetana By Dr. Vrishali Raut
Manasik Aghaat Samajun Ghetana By Dr. Vrishali Raut
Couldn't load pickup availability
‘मानसिक आघात समजून घेताना’ हे पुस्तक मानसिक आरोग्यावर गांभीर्याने भाष्य करते. या पुस्तकाचे धागे माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडले जातात. मी शिक्षण घेत असताना आणि करियर करत असताना गुन्हेगारी, तुरुंगवास, व्यसन, बदनामी आणि त्यातून सावरताना नकारात्मक भावना अनुभवल्या होत्या. त्यामुळे झालेला मानसिक त्रास मी सहन केलेला आहे. मागच्या पाच-दहा वर्षांपासून अपराधीपणा, भीती, दुःख आणि राग या टोकाच्या भावना मी अनुभवल्या आहेत. त्या वेळी मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेकांना मार्गदर्शन मिळेल. माझ्या आयुष्यातली जी वर्षे भयाण अंधारात गेली, त्याला त्यांना सामोरे जावे लागणार नाही.
पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात लेखिकेचे व्यक्तिगत जीवन आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांचा खंबीरपणा, आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा, मेहनत आणि हार न मानण्याची वृत्ती याबद्दल कौतुक वाटते. कारण अशा परिस्थितीतून सावरताना माणूस व्यसन, गुन्हेगारी आणि गैरवर्तनाला बळी पडतो. पण अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडता त्यांनी मानसिक आघाताशी धैर्याने दिलेला लढा प्रेरणादायी आहे.
‘जवळच्या व्यक्तीचा मृत्यू’ हा आघात सहन करताना अनुभवायला येणारी ‘शोक’ ही भावना शरीर व मन यावर कसा परिणाम करते, हा सहसा न बोलला जाणारा विषय या पुस्तकात सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. एकूणच आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व ठळक करणारे हे पुस्तक आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.