Ganam
Maharashtratil Virgal By Sadashiv Tetwilkar (महाराष्ट्रातील विरगळ)
Maharashtratil Virgal By Sadashiv Tetwilkar (महाराष्ट्रातील विरगळ)
Couldn't load pickup availability
युध्दात, कधी साहसी कृत्यात प्राण गमावलेल्यांना वीर म्हटले जाते. अशा वीरांची स्मारके गावकऱ्यांकडून अथवा कुटुंबियांकडून आदरपूर्वक उभी केली गेली. त्यांना वीरगळ म्हटले जाते. वीरगळांची संख्या आपल्या येथील खेडोपाडी लक्षणीय प्रमाणांत आढळते. सती गेलेल्या मृत स्त्रियांची स्मारकेही आढळतात. वीरगळ हे ही आपला इतिहास समजून घेण्याचे साधन होऊ शकते.
श्री. सदाशिव टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील विरगळ या अनोख्या ग्रंथरूपी दालनातून इतिहासाच्या साधनांमध्ये मोलाची भर टाकली आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. गूंथर सांथायमर यांनी सर्वप्रथम संस्कृतीच्या या प्रकारच्या अपारंपरिक ऐतिहासिक साधनांकडे लक्ष वेधले होते. श्री. टेटविलकर यांनी त्यांची वाट पुसत आपल्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीतून साकारलेला हा ग्रंथ ज्ञानपूर्ती आणि माहितीच्या डोहात पुढचे पाऊल टाकणारा आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.