Ganam
Maharashtratil Gadkille By Prashant Kulkarni
Maharashtratil Gadkille By Prashant Kulkarni
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले डोंगरी किल्ले, जलदुर्ग आणि भुईकोट अशा तब्बल पन्नास महत्त्वाच्या किल्ल्यांचा रंजक, वाचनीय भाषेत घेतलेला माहितीपूर्ण धांडोळा म्हणजे 'महाराष्ट्रातील गड-किल्ले'.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदुस्थानला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न होय. कारण मध्ययुगीन काळात उभ्या हिंदुस्थानात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची हिंमत कोणी केली नव्हती .ती हिंमत शिवरायांनी केली.गड -कोट किल्ल्यांच्या आधारे बलाढ्य शत्रूला मोठ्या कौशल्याने तोंड दिले. महाराष्ट्रात किंवा भारतात शिवजन्मापूर्वीही किल्ले होते. मात्र त्या किल्ल्यांचा व्यावहारिकपणे वापर करुन हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे अनोखे कार्य शिवरायांनी केले. जगाच्या पाठीवर कुठेही एवढे किल्ले नाहीत; एवढी दुर्गश्रीमंती फक्त एकट्या महाराष्ट्रातच आहे. सदर पुस्तकात डोंगरी किल्ले, जलदुर्ग व भुईकोट किल्ल्यांचा मागोवा घेतला असून त्या अंतर्गत काही वनदुर्ग व समुद्रालगतचे भुईकोट किल्लेही आले आहेत.महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे हे साक्षीदार असून हे किल्ले बांधण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घाम गाळला आहे तर शत्रूंपासून वाचवण्यासाठी रक्ताचा सडा शिंपडला आहे. या किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा इतिहासाचा ठेवा जपला तरच पुढील पिढीला आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण राहणार आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.