Ganam
MAHARANI YESUBAI by DR. SUVARNA NAIK NIMBALKAR
MAHARANI YESUBAI by DR. SUVARNA NAIK NIMBALKAR
Couldn't load pickup availability
महाराणी येसूबाई...मराठेशाहीतील एक त्यागमूर्ती...पतीची निर्घृण हत्या झालेली असताना स्वत:च्या मुलाला, शाहूला राज्यावर न बसवता राजाराम महाराजांचं मंचकारोहण करणारी, त्यांना आणि अन्य महत्त्वाच्या लोकांना रायगडावरून अन्यत्र रवाना करून स्वत: रायगड लढविणारी, मुघल वरचढ होत आहेत हे पाहिल्यावर स्वत:च्या, शाहूराजांच्या आणि स्वत:बरोबरच्या अन्य लोकांच्या सुरक्षिततेची हमी मिळवून मग मुघलांना शरण जाणारी, औरंगजेबासमोर राजाराम महाराजांची निंदा करून, आतून मात्र पत्रव्यवहाराद्वारे राजाराम महाराजांच्या संपर्कात राहणारी...औरंगजेबाच्या कैदेतेही स्वाभिमान न सोडणारी...त्या कैदेतही शाहू महाराजांवर हिंदुत्वाचे आणि राजधर्माचे संस्कार करणारी...शाहूराजांच्या सुटकेनंतर काही वर्षांनी सुटका झाल्यावर शाहूंराजांच्या राज्यकारभारात ढवळाढवळ न करता योग्य सल्ला देणारी...संभाजीराजांच्या हत्येनंतर मराठ्यांमध्ये फूट पडू नये आणि स्वराज्याचं रक्षण व्हावं म्हणून त्याग करणार्या मुत्सद्दी महाराणी येसूबाईंची धगधगती जीवनगाथा
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.