Ganam
Mahabharatatil 108 Adabhut Rahasya By samar
Mahabharatatil 108 Adabhut Rahasya By samar
Couldn't load pickup availability
महाभारतातील अनेक कथा आपण कीर्तन आणि अन्य माध्यमातून
ऐकल्या वाचल्या पाहिल्या आहेत. तरीही एक लक्ष श्लोक असलेल्या महाभारतात अनेक रहस्यमयी घटना आहेत, ज्या अजून आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही. चित्रकार आणि मालिकांच्या दिग्दर्शकांनी आपल्यासमोर ठेवलेले रथ, बाण आणि शस्त्र हे मूळ महाभारतातील वर्णनांहून अतिशय वेगळे आहेत. या पुस्तकात लेखकाने श्लोकांच्या संदर्भासह अस्त्रशस्त्रांचे मूळ वर्णन वाचकांसमोर ठेवले आहे. तसेच 'गंधर्व विरूद्ध कौरव' युद्धासारख्या अनेक अपरिचित घटनाही मांडल्या आहेत. उदाहरणार्थ, कौरवांच्या जन्माबाबत विविध आख्यायिका सांगितल्या जातात, पण महाभारतातील कौरवजन्माची कथा अतिशय अद्भुत आणि थक्क करणारी आहे. या निमित्ताने संपूर्ण महाभारतच संक्षिप्त स्वरूपात वाचकांना उपलब्ध झाले आहे. लेखकाने केवळ प्राचीन महाकाव्यातील कथांना जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून महाभारताचा अभ्यास केला आणि पुढे हे लेखन केले आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.