Ganam
Mahabharata : Mahakavya Aani Rashtra By Dr. Ganesh Devy
Mahabharata : Mahakavya Aani Rashtra By Dr. Ganesh Devy
Couldn't load pickup availability
गणेश देवी यांचे ‘महाभारत : महाकाव्य आणि राष्ट्र’ हे नवे पुस्तक
सध्याच्या राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वैचारिक स्वराज्याच्या
पुनरुत्थानाची दिशा दाखवते. विसाव्या शतकातील इतर विवेचनांहून
देवींचे वेगळेपण असे की, ते आध्यात्मिक तत्त्वचर्चा वगळून केवळ कथेवर
लक्ष केंद्रित करतात. महाभारतातील मिथके, भव्यता, वैचित्र्य आणि
अतर्क्य गोष्टींनी भारावून न जाता ते या मिथकांतील अर्थ वाचतात.
महाभारताचा कुणी एक नायक नाही, असे सांगतानाच या महाकाव्याच्या
आरंभी आणि अखेरीस असलेला यम म्हणजेच काळाकडे ते लक्ष वेधतात
आणि हे कालचक्राचे महाकाव्य असल्याचे सुचवतात.
देवींच्या महाभारताच्या आकलनाचा सर्वांत आकर्षक पैलू म्हणजे
सामाजिक रूढीवादाच्या दोषारोपांना तोंड देण्याची त्यांची तयारी.
देवींचा युक्तिवाद आहे की, ‘ब्राह्मणेतरांचा धर्मग्रंथ’ हेच
महाभारताच्या लोकप्रियतेचे कारण आहे.
माझ्यासाठी हा एक राजकीय ग्रंथ आहे, आपल्या महाकाव्यांच्या
गैरवापराचा प्रतिकार करणारे आणि न्यूनगंड न ठेवता अथवा श्रेष्ठत्वाचा
खोटा आव न आणता आपला सांस्कृतिक वारसा पुन्हा मिळवण्याचा
मार्ग सुचवणारे हे भाष्य आहे.
- योगेंद्र यादव
सदस्य, स्वराज इंडिया । स्वराज अभियान । जय किसान आंदोलन
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.