sadhana prakashan
Lokshahicha Kaivari / लोकशाहीचा कैवारी By Vasu Deshpande
Lokshahicha Kaivari / लोकशाहीचा कैवारी By Vasu Deshpande
Couldn't load pickup availability
१९२२ ते ७१ असे जेमतेम ४८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बॅ. नाथ पै यांचे जीवन म्हणजे अकाली विझलेला एक झंझावात होता. कोकणात जन्माला आलेला हा माणूस तारुण्याच्या उंरबठ्यावर असताना १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात उडी घेतो, स्वातंत्र्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जातो, १९५२ ची निवडणूक बेळगावमधून लढवण्यासाठी भारतात परत येतो, त्या निवडणुकीत पराभव झाल्यावर उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत इंग्लंडला जातो. बॅरिस्टर होऊन ऑस्ट्रियन मुलीशी विवाह करून भारतात येतो आणि १९५७, ६२ व ६७ या तिन्ही निवडणुका कोकणातील राजापूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या वतीने जिंकतो, लोकसभेत उत्तम संसदपटू म्हणून काम करताना देशाचे लक्ष वेधतो आणि वयाची पन्नाशी गाठायच्या आत हे जग सोडून जातो. अशा या झंझावाताचे त्याच्या जवळच्या मित्राने व सहकाऱ्याने रेखाटलेले हे चरित्र आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.