madhushree publication
Lokmata Godavari | लोकमाता गोदावरी By Chandrakant Kulkarni | L. K. Kulkarni | चंंद्रकला कुलकर्णी - एल. के. कुलकर्णी
Lokmata Godavari | लोकमाता गोदावरी By Chandrakant Kulkarni | L. K. Kulkarni | चंंद्रकला कुलकर्णी - एल. के. कुलकर्णी
Couldn't load pickup availability
नद्यांना लोकमाता मानणाऱ्या आपल्या भारतात पुण्यपावन गंगेखालोखाल श्रेष्ठ मानली जाणारी नदी म्हणजे गोदावरी. नाशिकजवळच्या ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावणारी आणि १४६५ किलोमीटर्सचा प्रवास करून राजमहेंद्रीच्या पुढे विस्तीर्ण त्रिभुज प्रदेशातून सात धारांनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी ही दक्षिणगंगा! असंख्य लहानमोठ्या उपनद्यांना आपल्या प्रवाहात सामावून घेत आणि दोन्ही तीरांवरचे लोकजीवन विविधांगांनी समृद्ध करत
राहिलेल्या या नदीची महती सांगणारे हे पुस्तक मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोदावरी नदीचे भौगोलिक बारकावे टिपत, विविध नकाशांच्या व छायाचित्रांच्या साहाय्याने तिचा बहुराज्यीय प्रवास घडवतानाच अनेक रंजक लोककथांच्या माध्यमातून सांस्कृतिक स्थानमाहात्म्याची ओळखही या पुस्तकात करून दिली आहे. या नदीची जलसंपदा, तिचे शेतीवर व पर्यायाने अर्थकारणावरही होणारे परिणाम, काळाच्या ओघात नदीकाठावरच्या नागरी जीवनाचा बदलत गेलेला चेहरामोहरा आणि शहरीकरणापाठोपाठ वाढलेल्या प्रदूषणाची समस्या व तिच्यावर योजायलाच हवेत असे उपाय समजून घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासूंच्या दृष्टीनेही हे पुस्तक एखाद्या संदर्भसख्यासारखे उपयुक्त आहे. या नदीशी निगडित कुंभमेळ्यासह इतरही सांस्कृतिक प्रथा-परंपरा आणि त्यांचे मराठी साहित्यात पडलेले प्रतिबिंब याबद्दलची संकलित माहिती सश्रद्ध वाचकांना खूपच मोलाची वाटेल. परिशिष्टांच्या रूपात समाविष्ट तक्ते व संदर्भसाहित्याची सूची ही इतर उल्लेखनीय वैशिष्ट्ये. भूगोलविषयक ज्ञानसाधनेला वाहून घेतलेल्या एका व्रतस्थ दांपत्याचे आणखी एक संग्राह्य पुस्तक!
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.