Ganam
Linchpin By Seth Godin Chandrashekhar Marathe
Linchpin By Seth Godin Chandrashekhar Marathe
तुमची आवड, आवडीचे क्षेत्र आणि तुमचे भविष्य यात खूप मोठा बदल घडवून आणण्याची तुमची क्षमता यांवर लिंचपिन भाष्य करते.
यापूर्वी प्रत्येक कामाच्या ठिकाणी दोन टीम असत: व्यवस्थापन आणि कामगार. आता तिसरी टीम आहे: लिंचपिन. पद कोणतेही असो लिंचपिन शोध लावतात, नेतृत्व करतात, इतरांशी संबंध जोडतात, गोष्टी घडवून आणतात आणि अराजकतेतून सुव्यवस्था निर्माण करतात. नियमपुस्तिका नसेल तर काय करायचे, हे त्यांना समजते. त्यांना त्यांचे काम आवडते आणि त्या कामात ते त्यांचे तन आणि मन अर्पण करतात. लिंचपिन हे महान संस्थांचे अत्यावश्यक आधारस्तंभ आहेत आणि आजच्या जगात त्यांना सर्वोत्तम नोकऱ्या आणि सर्वाधिक स्वातंत्र्य मिळते.
इतरांच्या लक्षात न आलेला सोपा मार्ग तुम्हाला कधी सापडला आहे का? संघर्षावर तोडगा काढण्याचा नवा उपाय तुम्ही शोधला आहे का? ज्याच्यापर्यंत इतर कुणीही पोहोचू शकले नसतील, अशा व्यक्तीशी तुम्ही संबंध जोडला आहे का? असे असेल तर अपरिहार्य होण्यासाठी जे काही आवश्यक असते, ते तुमच्याजवळ आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता- आणि तुम्हाला ते करायलाच हवे.
सेठ गोडीन हे ट्राइब्स, द डिप, पर्पल काउ, ऑल मार्केटर्स आर लायर्स आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आहेत. या पुस्तकांनी लोकांच्या विचार आणि कृतीमध्ये बदल घडवून आणला आहे. ते जगातील सर्वांत प्रभावशाली व्यावसायिक ब्लॉगर असून, ‘अल्टएमबीए’चे संस्थापक आणि अतिशय लोकप्रिय वक्तेदेखील आहेत.
त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी लोक पैसे का मोजतात, यात नवल ते काय!
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.