Ganam
Limelight Pradeshik By Achyut Godbole, Satish Kulkarni
Limelight Pradeshik By Achyut Godbole, Satish Kulkarni
Couldn't load pickup availability
लाईमलाईट प्रादेशिक | लेखक: अच्युत गोडबोले, सतीश कुलकर्णी
पाने - ३४४
(२५ प्रादेशिक चित्रपटाबद्धल सविस्तर माहिती )
____________________________________________________
अभिप्राय :
1) अच्युत गोडबोले याला देवानं काय अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवलाय, हे देवाला तरी आठवतंय का... असा प्रश्न मी हे पुस्तक वाचताना स्वत:लाच कितीदा विचारला, हे मलाही आठवत नाही.
साधारण एका जन्मात, एक अत्यंत हुशार माणूस किती विषय अभ्यासू शकतो? किती पदव्या मिळवू शकतो? आणि किती विषयांत १०० टक्के मार्क मिळवू शकतो? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, त्या विषयाला हात घालून, त्याचा अधाश्यासारखा अभ्यास करून, त्याचा रसास्वाद घेणं; आणि ते लिहून काढून, लोकांना त्याचा आनंद मिळावा म्हणून पुस्तकरूपात ते उपलब्ध करून देण्याचा चमत्कार हा माणूस किती वर्षं करतोय, हेही आता आठवेनासं झालंय!
आत्ताच अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेलं नवीन पुस्तक क्लासिकमध्ये मोडणाऱ्या चित्रपटांचं परीक्षण... नाही समीक्षण... नाही रसग्रहण... नाही रसपानग्रहण... नाही....
मला तर शब्दच सुचत नाहीये असं लिहिलंय हे!
एक अभिनेत्री म्हणून एवढंच सांगते की, सिनेमा माध्यमाचा एवढा सखोल अभ्यास आणि विचार करून सिनेमा बनवणारी मंडळीसुद्धा हे पुस्तक वाचून काहीतरी नवीन शिकतील, असं मनात आलं. त्या-त्या फिल्ममेकरचा मोठेपणा नेमका टिपून आपल्यापर्यंत पोहोचवलाय.
एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक दिल्याबद्दल अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी ह्यांची मी सदैव ऋणी आहे!
वंदना गुप्ते
___________________________________________________________________________________
2) चित्रपटांची आवड असणाऱ्या रसिक-प्रेक्षकांना उत्तम, रंजक प्रादेशिक चित्रपटांची कथानकं आणि दिग्दर्शकीय कंगोरे, अभिनय-वैशिष्ट्ये यांची अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी केलेली ही ‘क्लासिक मुशाफिरी’ हवीहवीशी वाटेल!
मकरंद अनासपुरे
______________________________________________________________________________________
3) अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रादेशिक चित्रपटांच्या रसास्वादावरील ‘लाईमलाईट प्रादेशिक’ हे पुस्तक वाचलं. बंगाली , कन्नड, गुजराती या भाषा आणि त्यावरील चित्रपट आपल्याला परिचित असतात. पण मैथिली भाषेतील चित्रपटांचा समावेशसुद्धा या पुस्तकात आहे, ही विशेष कौतुकाची बाब आहे!
सर्व चित्रपटांचा रसास्वाद अतिशय रंजक पद्धतीने घेतला असल्याने हे चित्रपट आवर्जून बघावेसे वाटतात. प्रादेशिक चित्रपटांवरील एक पुस्तक मराठीतून येते आहे, हा निश्चितच एक आनंददायी ठेवा आहे!
या पुस्तकाविषयीची अधिक माहिती आपण लेखकद्वयींनी गप्पांच्या स्वरूपात एखाद्या पॉडकास्टवर दिली तर प्रादेशिक चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास वाटतो. खूप खूप अभिनंदन!
सोनाली कुलकर्णी
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.