Ganam
L'étranger By Albert Camus
L'étranger By Albert Camus
आज आई गेली. किंवा कदाचित कालही असेल...’
‘लेत्राँजे’ या कादंबरीची सुरुवात अशी होते. जागतिक साहित्यात अजरामर झालेल्या वाक्यांत या ओळीचा समावेश होतो.
फ्रेंच भाषेतील ‘लेत्राँजे’ (‘द स्ट्रेंजर’ किंवा ‘द आउटसायडर’) या कादंबरीने जगभरातील साहित्याचे मापदंड बदलले. युद्धोत्तर काळातील सर्वोत्तम साहित्यकृती म्हणून जगभर तिची चर्चा झाली. वाङ्मयीन व बौद्धिक वर्तुळामध्ये आल्बेर काम्यू नावाचा मोठा दबदबा निर्माण झाला.
जगभरातील बहुसंख्य भाषांमध्ये ‘लेत्राँजे’अनुवादित झाली आहे.
नोबेल पुरस्कारापर्यंतच्या काम्यूच्या प्रवासातील ‘लेत्राँजे’हा एक मोठा टप्पा मानला जातो.
कादंबरीचा नायक मरसो याला जो एकाकीपणा आणि उपरेपणा अनुभवाला येतो, त्याविषयी काम्यूनेच जे म्हणून ठेवले आहे ते त्याला समजून घेण्यासाठी उपयोगी पडते : जो माणूस आपल्या आईच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी अश्रू ढाळत नाही, त्याला आपल्या समाजात मृत्युदंड होणे क्रमप्राप्त आहे.
समाज त्याला मृत्युदंडच का ठोठावणार, याची कारणमीमांसा शोधू गेल्यास असे लक्षात येते की, तो खरे तेच सांगतो आणि खोटे बोलायला नकार देतो, मग ते त्याच्यासाठी जीवघेणे ठरले तरीही. आपले आयुष्य सोपे करण्यासाठी तो इतरांप्रमाणे आपल्या खर्या भावना लपवत नाही. दांभिकतेने जगणार्या समाजाला त्यामुळेच
तो धोकादायक वाटतो. मात्र, ज्याचा सत्याचा शोध त्याच्या जगण्यातून आणि संवेदनांतून त्याला आपल्या अटळ अंतापर्यंत नेतो, तो मरसो आजही जगभरातील वाचकांना अंतर्मुख करतो, तोदेखील त्यामुळेच.
पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेत्राँजेचा हा अनुवाद मूळ फ्रेंच भाषेतून अभिजित रणदिवे यांनी मराठीत केला आहे. अभिजात कलाकृती वाचल्याचा बौद्धिक आनंद आपणास मिळेल हे नक्की.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.