Skip to product information
1 of 1

sakal media pvt ltd

Krutrim Buddhimatta : Abhasakadun Vastavakade कृत्रिम बुद्धिमत्ता आभासाकडून वास्तवाकडे By Sundeep Waslekar संदीप वासलेकर

Krutrim Buddhimatta : Abhasakadun Vastavakade कृत्रिम बुद्धिमत्ता आभासाकडून वास्तवाकडे By Sundeep Waslekar संदीप वासलेकर

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेची आश्वासने, तिची शक्ती आणि तिच्याशी संबंधित गहन अनिश्चितता अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकते. हे पुस्तक वाचकाला जगभरातील विविध दृष्टिकोनांमधील एका व्यापक प्रवासावर घेऊन जाते. ग्लोबल साउथमथील शेतजमिनी आणि आरोग्यसेवा केंद्रांपासून, जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जाते, ते महासत्तांच्या धोरणात्मक सत्ताकेंद्रांपर्यंत, जिथे ती वैज्ञानिक वर्चस्व आणि भूराजकीय प्रभाव वाढविण्याचे माध्यम मानली जाते, असा हा प्रवास आहे.

भारतासारख्या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आरोग्यसेवा, शेती, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणणारे साधन म्हणून पाहिले जाते. तर अमेरिका आणि चीन यांसारखे देश तिला वैज्ञानिक शोध आणि जागतिक वर्चस्वाचे शक्तिशाली इंजिन मानतात. मात्र या महत्त्वाकांक्षांच्या पाठीमागे एक अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी चिंता दडलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातील काही अग्रणी आणि संस्थापक मानल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या मते, प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली मानवसभ्यतेच्या सातत्यालाच धोका निर्माण करू शकतात.

खऱ्या अथनि जागतिक दृष्टिकोन सादर करणारे हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेची परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आणि तिच्याशी संबंधित अस्तित्वगत (Existential) जोखमी यांचा सखोल आणि संतुलित आढावा घेते. तांत्रिक आकलन, भूराजकीय विश्लेषण आणि नैतिक चिंतन यांची सांगड घालत हे पुस्तक अखेरीस भारतासाठी एक धाडसी आणि व्यावहारिक धोरणात्मक मार्ग सुचवते.

लेखकाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुरक्षेशी संबंधित जगातील सर्वात महत्त्वाच्या चर्चामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका स्विस राजदूतासोबत संयुक्तपणे तीन वर्षे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्य राष्ट्रांदरम्यान अणुक्षेत्रातील जबाबदार आचारसंहितांवर संवाद प्रक्रियेचे सह-अध्यक्षपद भूषविले. २०२५ पासून ते अत्यंत कृत्रिम बुद्धिमत्ताजोखमांच्या (extreme Al risks) प्रशासनासाठी जागतिक करार (Global Compact) घडवून आणण्याच्या उद्देशाने 

आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक एकमत निर्माण करण्याच्या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. या सर्व अनुभवांमधून हे पुस्तक साकारले आहे.

शास्त्रज्ञ जेफ्री हिंटन यांच्याबरोबर झालेल्या भेटीतून कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करण्यासाठी प्रेरित होऊन, लेखक जगाच्या भविष्यास दिशा देण्यासाठी सत्तरहून अधिक देशांबरोबर सहकार्य करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय विचारमंचाचे (थिंक टँकचे) नेतृत्व करतात.

View full details