Ganam
Krantijyoti Savitribai Phule By Sayali Pranjape
Krantijyoti Savitribai Phule By Sayali Pranjape
Couldn't load pickup availability
एक दिवस तर हद्दच झाली. सावित्रीबाई शाळेत निघालेल्या असताना त्यांच्या वाटेत एक धटिंगण गुंड येऊन उभा राहिला.
‘‘ए बाई, बर्या बोलानं घरी जा... न्हाईतर फुडं जे व्हईल, त्याची जिम्मेदारी माझी नव्हं!’’ त्याने दम दिला.
त्या गुंडाचा अविर्भाव बघून सावित्रीबाई क्षणभर गांगरल्या, पण त्यांनी लगेचच सगळं अवसान गोळा केलं आणि पुढे होऊन त्या गुंडाला एक जोरदार थप्पड लगावली. गुंडाला याची अजिबातच अपेक्षा नव्हती. सावित्रीबाईंनी त्याच्या धमकावण्याला उत्तरही दिलं, पण ते ऐकायला तो तिथे थांबलाच नव्हता. त्याने तडक पोबारा केला होता!
समाजाचं काम करणार्या माणसाकडे जितकी आत्मीयता, तितकीच धमक आणि तितकाच संयमही लागतो. या तिन्हींचा अर्क म्हणजे ‘सावित्रीबाई फुले’! अर्थात अशा बाईला जर जोतिरावांसारख्या जोडीदाराची साथ मिळाली, तर ’स्त्री-पुरुष समानता’ हे फक्त शब्द राहत नाहीत. त्या संपूर्ण समाज-बदलाच्या पाऊलखुणा ठरतात.
म्हणूनच हे पुस्तकं वाचकांच्या हाती ठेवणं, म्हणजे एका अर्थी उत्तम नागरिक घडवण्याच्या दिशेने छोटंसं पाऊल टाकणं!
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.