Ganam
Kolleruchya Paulkhun |कोल्लेरूच्या पाऊलखुणा By Akkineni Kutumbarao Asavari Barve
Kolleruchya Paulkhun |कोल्लेरूच्या पाऊलखुणा By Akkineni Kutumbarao Asavari Barve
ही कादंबरी लेखकाच्या बालपणीचं स्मृतिचित्र आहे.
त्यातील सगळे लोक खरे आहेत. ते गाव खरं आहे.
ते तळं खरं आहे.
कोल्लेरू... ही आंध्र प्रदेशातील एका सरोवराची गोष्ट आहे.
या सरोवरावर त्याच्या आसपासच्या गावांतील लोकांचं जगणं अवलंबून होतं. त्या लोकांच्या आशा-निराशा, सुख-दुःख
या सरोवराच्या पाण्याशी जोडलेलं होतं. या गावांचं पालनपोषण ते तळं करीत असे आणि या तळ्यानंच त्यांच्या जीवनात समृद्धी आणलेली होती. दरसालच्या पुरात गाव ध्वस्त व्हायचं. काही काळ इकडे तिकडे विखरायचं आणि पूर ओसरल्यावर पुन्हा नीट आवरून उभं राहायचं.
पाण्याची जीवनदायी शक्ती ओळखून या गावानं सरोवरातच समूहशेतीचा अद्भुत प्रयोग यशस्वी केला होता.
कालांतरानं जगाच्या बाजारी तत्त्वज्ञानानं पाहता पाहता या तळ्यावर आक्रमण केलं. गावानं संघर्ष केला,
पण तो अपुरा पडला. पाहता पाहता तळं नष्ट झालं.
त्याच्या भोवतालचं जीवन उद्ध्वस्त झालं.
एक पाच वर्षांचा मुलगा आपल्या बालपणाच्या आठवणी जागवतो आहे. एका समृद्धीच्या कालखंडाचा साक्षीदार असलेला तो प्रौढपणी परत त्या सरोवरापाशी आला,
तेव्हा तो तलाव हळूहळू लुप्त होताना त्याला दिसला.
तो त्या तळ्याचा इतिहास सांगतो आहे.
ही कादंबरी म्हणजे भारतातील सर्वांत मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक असलेल्या
कोल्लेरूचं शोकगीत आहे.
अक्किनेनी कुटुंबराव अनु. आसावरी बर्वे
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.