Ganam
Kathasetu By Sanjay pandya Sushama Shaligram
Kathasetu By Sanjay pandya Sushama Shaligram
Couldn't load pickup availability
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही प्रांतांची आपापली वेगळी भाषा असली तरी त्यांच्या लोकजीवनात काही अंशी साम्यही आहे आणि म्हणूनच मराठी आणि गुजराती भाषांना ‘भाषा-भगिनी’ म्हणणे उचित ठरेल.
भारतीय भाषांतील साहित्याचे अभिसरण होत राहावे, भारतीय संस्कृतीचा सामायिक वारसा जपण्याचे हरतर्हेने प्रयत्न व्हावेत, त्यासाठी भारतीय भाषांचे आपापसात अनुवाद होऊन भाषा-भगिनींच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळावी,
यासाठी ‘आंतरभारती’ ही संकल्पना अस्तित्वात आली.
‘कथासेतू’ या कथासंग्रहाद्वारे गुजराती भाषेतील काही ख्यातनाम साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध होत आहेत. या निमित्ताने गुजराती भाषेतील जुन्या-नव्या सुप्रसिद्ध एकवीस साहित्यिकांच्या लक्षणीय साहित्यकृतींचा आस्वाद मराठी वाचकांना मिळणार आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.