Ganam
Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan By Dr. Sudam Mandage
Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan By Dr. Sudam Mandage
Couldn't load pickup availability
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. सुदाम मांडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील लिखित पत्रांचे संशोधन करून कर्मवीरांचे शिक्षणविषयक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वावलंबी शिक्षण, चारित्र्य संवर्धन, अस्पृश्यवर्गाचे शिक्षण व उन्नती आणि समग्र रयतेचे शिक्षण या मूल्याधिष्ठित ध्येयांचा वेध घेणारी चिंतनशील मांडणी लेखकाने यात केलेली आहे.
- कर्मवीरांनी आयुष्यभर अंगीकारलेल्या जीवनमूल्यांविषयीची लेखकाने या पुस्तकात प्रसंगपरत्वे नोंदवलेली भाष्ये अतिशय प्रगल्भ व नव्या विचारांना चालना देणारी असून, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.
- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. मांडगे यांनी काटेकोर संशोधन आणि सखोल चिंतन यांच्या साहाय्याने भाऊराव पाटील यांचे अलक्षित पैलू वाचकांसमोर आणले आहेत.
- निखळ संशोधकीय प्रेरणा, वैविध्यपूर्ण संदर्भांचा चिकित्सक वेध, वस्तुनिष्ठ तरीही वेधक भाषा यांच्या बळावर हे संशोधनपर पुस्तक चिकित्सक संशोधनाचा नवा वस्तुपाठ मांडते.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.