Skip to product information
1 of 1

Ganam

Kaksha By Tara Vanarase

Kaksha By Tara Vanarase

Regular price Rs. 140.00
Regular price Rs. 165.00 Sale price Rs. 140.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

तारा वनारसे यांचे ‘कक्षा’ (१९५५) हे उल्लेखनीय नाटक !
काही व्यक्ती स्वतःलाच कर्तव्य, दिलेल्या शब्दाचे पालन, दुसऱ्याचे मन न दुखवणे, उपकारकर्त्यांचे आजन्म ऋणाईत राहणे अशा मर्यादांच्या कक्षा स्वतःभोवती आखून घेतात. पण या सर्व बाह्य कृत्रिम बंधनामुळे स्वतःच्या अंतरोर्मांना दडपत राहतात. एकपरीने स्वतःवरच अन्याय करीत राहतात. अंतर्मनात असमाधानी राहतात. बाह्य गोष्टींचा विचार आणि आचार करण्यात कुचंबून जातात आणि स्वतःचा आनंद गमावून बसतात. त्याग, कर्तव्य यांतला भ्रामक आनंद खरा नव्हे, असे त्यांना जाणवले तरी त्यांच्या स्व-निर्मित ‘कक्षा’च त्यांना दुःखी करतात. ‘कळतं पण वळत नाही’, अशी त्यांची अवस्था होते. समुद्र जसा आपली कक्षा ओलांडू शकत नसल्याने आतल्या आतच खळबळत राहतो अशी अवस्था ‘कक्षा’ ची नायिका उर्मिला हिची झाली आहे.
एक गरीब ध्येयवादी गायनमास्तर नाना यांची उर्मिला ही रूपगुणसुंदर, बुद्धिमान, विद्यावेतनावर शिक्षण घेऊन डॉक्टर होत असलेली मुलगी आहे. श्रीमंत घमेंडखोर अण्णासाहेब यांचा सालस पण सामान्य बुद्धिमत्तेचा मुलगा वसंत याने तिच्या जिवावरच्या आजारपणात तिच्यावरील उत्कट ओढीने सर्वतोपरी मदत केल्याने मनोमन त्याचे ऋण मानते. त्यातूनच ‘सोडून जाणार नाही’, असे वचन त्याच्या आग्रहावरून देते. पण तिचे खरे प्रेम अण्णासाहेबांचा आश्रित असलेला हुशार तरुण दिवाकर याच्यावर आहे. त्याचेही तिच्यावर प्रेम आहे. परंतु अण्णासाहेबांनी आपली लाडाने उन्मत्त झालेली मुलगी सुनंदाशी त्याचे लग्न ठरवले आहे. योगायोगाने गोपाळराव हे नानांचे श्रीमंत सज्जन स्नेही भेटतात आणि उर्मिलेला विलायतेला उच्च शिक्षणासाठी पाठविण्याच्या तयारीत असतात. तिची उत्कट इच्छा असूनही केवळ वसंताला दिलेला शब्द पाळण्यासाठी ती नकार देते आणि त्याच्याशी लग्नाला तयार होते. पण आतल्या आत मात्र स्वतःभोवती आखलेल्या ‘कक्षा’ तिचा कोंडमारा करीत असतानाच नाटक संपते. समुद्राचे रूपक लेखिकेने प्रास्ताविकात मुक्तछंद पद्धतीने सांगितले आहे.
हे नाटक स्त्री-पुरुष संमिश्र पात्रांचे असून कथानकाची बांधणी, प्रसंग नेटके आहेत. आत्माराम भेंडे ह्यांनी पहिल्या प्रयोगात नाना ही प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शनही केले होते. एकूण महिला मंडळाच्या कक्षा ओलांडून एकूणच मानवी स्वभावातील, वृत्तीतील गुंतागुंत शोधण्याचा प्रयत्न हे नाटक करते, ही उल्लेखनीय बाब आहे.
– तारा भवाळकर

View full details