Ganam
Kahani Ghargruhasthichee By Saroj Deshpande Dr. Sadanand Borse
Kahani Ghargruhasthichee By Saroj Deshpande Dr. Sadanand Borse
Couldn't load pickup availability
हे पुस्तक वाचायला घेताना कोणत्याही पूर्वकल्पना मनात न ठेवलेल्या बर्या,
कारण यातली सगळी स्फुटं तशी एकमेकांशी जोडलेली असली, तरी स्वतंत्र आहेत.
त्यांचा एखादा विशिष्ट असा ढाचा नाही.
आयुष्य सजगपणे आणि भरभरून जगताना मनात आलेले विचार, भावना, कल्पना,
कधी घेतलेले काही निर्णय, अवतीभोवतीची माणसं, त्यांचं वागणं,
वेगवेगळी परिस्थिती असं सगळंच दिसतं यात.
त्यांचं एक मिश्रण, नव्हे, रसायन बनतं.
आपली आयुष्यं असतात तशी बहुरंगी, बहुढंगी.
आपण त्याकडे जाणीवपूर्वक बघत असलो, तर खूप काही हाती गवसतं.
मला जे गवसलं, ते मला मांडावंसं वाटलं.
असंच अनेकांनी लिहिलं, तर ‘घरगृहस्थी' नावाचं एक भव्य कोलाज सहज बनू शकेल
आणि ते अतिशय वेधक अन् रंजकही होईल.
हे वाचून वाचणारे लिहिते झाले, तर मला भरून पावलं, असं मी म्हणेन.
सरोज देशपांडे
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.