Ganam
Jungle Lore By Jim Corabet
Jungle Lore By Jim Corabet
Couldn't load pickup availability
जिम कॉर्बेट यांनी जंगली प्राण्यांच्या जीवनक्रमाचा सखोल अभ्यास तर केलाच, पण असंख्य फोटोग्राफ्स, अनेक पुस्तके या द्वारा शहरी माणसाला वन्य जीवनाबद्दल-निसर्गाबद्दल सज्ञान केलं. त्यांनी निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकत, माणसाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेलं! गढवाल, कुमाऊं, नैनीतालच्या निसर्गरम्य परिसरात कॉर्बेट यांचे बालपण आणि शिक्षण झालं! त्या काळातच कालाढूँगी गावच्या जंंगलमय प्रदेशात त्यांना शिकारीचं आणि निसर्गवाचन करण्याचं शिक्षण मिळालं!
मूळचे शिकारी असलेल्या द्रष्ट्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवले की, जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणार्या १९ नरभक्षक वाघ आणि १४ नरभक्षक बिबट्यांची शिकार जिम कॉर्बेट यांनी केली. नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती व निरीक्षणे जिमने पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या. नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.
ब्रिटीश राजवाटीत मनोरंजनासाठी शिकार करण्याच्या रूढ पद्धतीला जिम कॉर्बेट यांनी आव्हान दिलं! त्याही पुढं जाऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणार्थ कायदे केले जावेत, यासाठी त्यांनी भारतात जे काही प्रयत्न केले, त्याला तोड नाही. त्याची दखल अवघ्या जगाला घ्यावीच लागली.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.