Ganam
JUGALBANDI By Vinay Sitapati avdhut Dongare
JUGALBANDI By Vinay Sitapati avdhut Dongare
आज भारतीय राजकारणात महत्त्वाची राजकीय शक्ती म्हणून उदयाला आलेल्या भारतीय जनता पक्षाची पायाभरणी कुणी व कशी केली, १९८४च्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन जागा मिळवणारा पक्ष पुढे चढत्या कमानीने कसा विस्तारत गेला, तसंच १९९८ ते २००४ या काळात आणि २०१४ सालानंतर सत्तेचा सोपान कसा चढला, या सर्व प्रश्नांचा वेध घेत ‘भाजप’च्या जडणघडणीचा विस्तृत पट या पुस्तकात राज्यशास्त्रज्ञ विनय सीतापती यांनी मांडला आहे. हे करताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या त्यातल्या दोन प्रमुख नेत्यांच्या एकमेकांत गुंतलेल्या जीवनक्रमाचं सूत्र मध्यवर्ती ठेवलं आहे.
वाजपेयी व अडवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये व धारणांमध्ये भेद असतानाही त्यांनी सहा दशकं आवश्यक तो सांघिक दृष्टिकोन स्वीकारून काम केलं. त्यांच्यात सुप्त स्पर्धा असली तरी परस्परांविषयीचं बंधुप्रेम, आदर, व्यावसायिक एकजूट आणि ऐक्यावर भर देणारी विचारप्रवृत्ती यांमुळे ते एकमेकांसोबत राहिले. त्यांची ही भागीदारी कथन करताना लेखक मोदींपूर्वीचा भाजप कसा होता आणि तो का विजयी झाला, याचा सखोल ऊहापोह या पुस्तकामध्ये करतात.
खाजगी कागदपत्रं, पक्षांचे दस्तऐवज, नियतकालिकांतील लेख, वर्तमानपत्रं आणि दोनशेहून अधिक मुलाखती यांचे दाखले देत विपुल संशोधनावर आधारलेलं… भारतीय राजकारणात रस असलेल्या प्रत्येकाला मर्मदृष्टी देणारं पुस्तक… जुगलबंदी!
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.