Ganam

Jhep Uchyate Chya Dishene By Vandan Kundetakar

Jhep Uchyate Chya Dishene By Vandan Kundetakar

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
प्रगती करायची असेल तर ध्येय असायला हवं हे आपण सगळे जाणतोच, पण नुसतं ध्येय असून चालत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतात. या पुस्तकात ध्येय निश्चित कसं करायचं इथपासून ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सहा पायऱ्या लेखकाने दिल्या आहेत. या पायऱ्या वापरून लेखकाने स्वतःचं २० किलो वजन कमी करण्याचं ध्येय कसं पूर्ण केलं याचं उदाहरणही दिलं आहे.
कुठल्याही क्षेत्रात उच्चतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य ते इनपुटस् कुठे आणि कसे द्यायचे याचं प्रशिक्षण या पुस्तकातून तुम्हाला मिळेल. 'झेप उच्चतेच्या दिशेने' हे पुस्तक तुम्हाला वरच्या दिशेने अर्थात प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी मदत करेल.
* आनंद, यश आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी भक्कम पाया कसा तयार करावा?
* ध्येयाचे सामर्थ्य
* ध्येयप्राप्तीच्या सहा पायऱ्या
* दृष्टिकोन सकारात्मक करण्यासाठी चार पायऱ्या
* पंपाचा संदेश !
लेखकाविषयी :
झिग झिगलर यांचं वर्णन 'मास्टर ऑफ मोटिव्हेशन, अमेरिकेचा आयकॉन, सेल्समनचा सेल्समन' असं केलं जातं आणि झिगलरची पुस्तकं म्हणजे 'इतिहासावर कायमचा प्रभाव टाकणारा वारसा' असं म्हटलं जातं. चारित्र्य, दृष्टिकोन आणि कौशल्य या तीन गोष्टींचा वापर करून संतुलित यश कसं मिळवायचं, हाच त्यांच्या लिखाणाचा गाभा आहे, ज्याचा अब्जावधी लोकांना फायदा झाला आहे.

View full details