Ganam
JEEV DYAVA KI CHAHA GHYAVA By Damodar Mauzo
JEEV DYAVA KI CHAHA GHYAVA By Damodar Mauzo
Couldn't load pickup availability
जीव द्यावा की चहा घ्यावा? या कादंबरीतून चहा आणि विज्ञान, चहा आणि जगणे, चहा आणि मरण अशी संपूर्ण कथानकात सांगड घातली आहे आणि चहा आणि प्रेमही येते. ही अनोखी मांडणी ठरते. सुरुवात आणि शेवट चहानेच होतो, म्हणूनच कादंबरीचे शीर्षक विचित्र पण समर्पक ठरते.
इथे नायकाभोवती वावरणाऱ्या व्यक्तिरेखा सहजपणे येतात. ठसा उमटवितात. त्यात वैविध्य तर आहेच, पण प्रत्येक व्यक्ती ठसठशीत होते आणि त्या सर्वांचे चांगले-वाईट वागणे नायकाशी भिडलेले आहे. त्यांच्या वावरण्यातून 'प्रतिक्षिप्त' वाटणाऱ्या प्रतिक्रियांतून सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व्यवहारांवर मूकपणे भाष्य येते. गोव्याचा भूगोल, समाज-रीत संस्कृती, शैक्षणिक पट... आदी कथानकाचा अटळ भाग ठरतात.
ही प्रादेशिक म्हणावी अशी संस्कृतीतील फोलपण दाखवत
घडलेली प्रेमकथा, पण प्रेमाचा त्रिकोण वगैरे रूढ बांधणीला डावलून
इथे घटनांनी कथानकाची पकड घेतली आहे. हिंदू, मुसलमान,
ख्रिश्चन आदी त्यात प्रतिबिंबित झाले तरी ह्यापलीकडे कथानक
झेपावते.
जगणे-मरणे अशा प्रमेयांमध्ये गुंफलेली ही विलक्षण वेगळी कहाणी कोंकणीतून मराठीत आणण्याचे सुफळ संपूर्ण काम शैला मावजी यांनी केले आहे.
• सुहासिनी कीर्तिकर
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.