mymirror
Je have te Milava| जे हवं ते मिळवा By Gaur Gopal Das| गौर गोपाल दास
Je have te Milava| जे हवं ते मिळवा By Gaur Gopal Das| गौर गोपाल दास
Couldn't load pickup availability
आपल्यापैकी अनेक जण, आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षितता... अशी असंख्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात. पण, खरंच हे सगळं आपण मिळवू शकतो का ? नोव्हेंबरच्या थंडीतील एका सकाळी गौर गोपाल दास जैसलमेरमध्ये आपला मित्र राकेश अरोरा यांच्या मुलाच्या तीन दिवस चालणाऱ्या लग्नसमारंभासाठी पोहोचतात. एक अनपेक्षित पाहुणा येतो आणि दोन कुटुंबांमध्ये फूट पाडण्याची शक्यता असलेले वादळ निर्माण होत असल्याचे गौर गोपाल दास यांच्या लक्षात येते. गौर गोपाल दास चर्चेद्वारे यजमानांना आणि पाहुण्यांना शांत करतात. तसेच त्यांच्या आतमध्ये दडून बसलेल्या भीती आणि इच्छांनाही उलगडून दाखवतात. एवढंच नाही तर, स्वतःच्या जीवनामधील चढउतारांच्या माध्यमातून केलेल्या प्रवासाद्वारे ते लोकांना योग्य आणि समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शनही करतात.
'जे हवं ते मिळवा' हे गौर गोपाल दास यांचं वैयक्तिक आणि गहन कथन आहे. महत्त्वाकांक्षा आणि समाधान, तसेच खरं असणं आणि केवळ भासवणं यांमध्ये अडकलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नवा दृष्टिकोन देणारं आहे. त्यांच्या खास विनोदबुद्धी, सहानुभूती आणि प्रभावी ज्ञानाने समृद्ध असलेलं हे पुस्तक 'आपला दृष्टिकोनच आपलं जीवन घडवतो' हे सांगतं. तसेच स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांच्यावर मात कशी करावी आणि जीवनप्रवासात स्वतःबद्दल करुणा कशी विकसित करावी, याचंही मार्गदर्शन करतं.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.