Skip to product information
1 of 1

madhushree publication

Jativar Janganna जातिवार जनगणना By Dr Laxman Yadav डॉ. लक्ष्मण यादव

Jativar Janganna जातिवार जनगणना By Dr Laxman Yadav डॉ. लक्ष्मण यादव

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

जातिवार जनगणना
हा प्रश्न फक्त आकड्यांचा नाही, तर कोट्यवधी लोकांच्या समृद्धीचा आणि सन्मानाचा आहे. आतापर्यंत जातिवार जनगणना ही फक्त एक मागणी होती. आता जातिवार जनगणनेची अंमलबजावणी करवून घेण्यासाठी आणि तिच्यातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीला धोरणांमध्ये रूपांतरित करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. आगामी काळ हा नवीन प्रकारच्या संघर्षांचा काळ असेल. त्याकरिता वैचारिक, व्यूहरचनात्मक आणि संघटनात्मक अशा हर प्रकारच्या पातळीवरच्या संघर्षाकरता सज्ज असण्याची आवश्यकता असेल. हे पुस्तक या संभाव्य परिस्थितींना समजून घेण्यासाठी जातिवार जनगणना, जनगणना आणि त्याच्याही आधीच्या गणना यांचा इतिहास सांगतं. ही प्रक्रिया इतकी सहजसुलभआणि कथनाच्या स्वरूपात मांडली गेली आहे की, लेखक आणि वाचक हे दोन्हीही या प्रवासातील सहप्रवासी पात्रं आहेत असं वाटू लागतं. लेखक अनेक ठिकाणी काही ना काही सांगतो, तर अनेक ठिकाणी वाचकांना स्वतः विचार करण्यास प्रवृत्त करतो. काही ठिकाणी तर तो वाचकांबरोबर बसून व्यूहरचना आखत असल्यासारखा वाटतो. प्रकरणं वेगवेगळी आहेत, परंतु विषय एकच आहे : जातिवार जनगणना !

View full details